Ad will apear here
Next
'वाचकांना वाङमयाकडे आकृष्ट करतात चित्रकार'
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मान्यवरपुणे :‘पोथ्या-पुराणांमधल्या रेखाचित्रांपासून आलेली, पुस्तकांवरच्या चित्रांची परंपरा, ब्रिटिशांच्या कारकीर्दीत बदलली. तथापि, नंतरच्या कालखंडात, दीनानाथ दलालांसारख्या अनेक चित्रकारांनी मुखपृष्ठांवरच्या चित्राबाबत प्रयोग करून, त्यांना भारतीय कला-रूप दिले. तीच परंपरा चंद्रमोहन कुलकर्णींसारखे चित्रकार पुढे नेत आहेत,’ असे गौरवोद्गार प्रख्यात चित्रकार सुहास बहुळकर यांनी काढले.

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या, कै. रेखा ढोले स्मृती पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. ‘अभिजात कला आणि उपयोजित कला यांच्या समन्वयातून वाचकांना वाङमयाकडेआकृष्ट करण्याचे मोलाचे कार्य चित्रकार करतात,’असेही ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, राजहंस प्रकाशनचे श्रीराम गीत, प्रवीण ढोले, वर्षा गजेंद्रगडकर उपस्थित होते. 

यावेळी कै. रेखा ढोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, 'केल्याने भाषांतर' या नियतकालिकासाठी, त्याच्या संस्थापक-संपादक सुनंदा महाजन यांना रु. २५ हजार आणि सन्मानचिन्ह, तर ‘रस्किन बॉण्ड’ या पुस्तकाच्या उत्कृष्ट मुखपृष्ठ आणि अंतर्गत सजावटीसाठी चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या वतीने सरिता कुलकर्णी यांना रु. १५ हजार आणि सन्मानचिन्ह, तर या पुस्तकाच्या निर्मितीमूल्यासाठी  पुण्याच्या रोहन प्रकाशनच्या रोहन चंपानेरकर यांना रु. दहा हजार आणि सन्मानचिन्ह, असे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

या समारंभात ग्रंथनिवड समितीच्या सदस्य लेखिका वर्षा गजेंद्रगडकर म्हणाल्या, ‘पुस्तकांचे अनुवादक केवळ दोन भाषांमधला दुवा नसतात तर दोन समाज - संस्कृती, परंपरा यांचा समन्वय साधून, त्यांना जोडतात आणि वाङमयाला श्रीमंत करतात.’ पुरस्काराच्या मानकऱ्यांच्या वतीने सुनंदा महाजन,  सरिता कुलकर्णी आणि रोहन चंपानेरकर यांनी मनोगत व्यक्त केले. चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मनोगत नागेश मोने यांनी वाचून दाखवले. 

समारंभाला राजहंस प्रकाशनचे प्रमुख दिलीप माजगावकर, पत्रकार सदा डुंबरे, अरविंद गोखले, लेखिका वंदना बोकील-कुलकर्णी, रवींद्र गुर्जर, चंद्रशेखर बर्वे,  सु. रा. चुनेकर, भा. र. साबडे, चित्रकार रविमुकुल, ‘मसाप’चे कार्यवाह उद्धव कानडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते, ‘मसाप’चे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. कार्यवाह बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZDIBC
Similar Posts
साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी ‘मसाप’ सज्ज पुणे : पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे. गेली ११० वर्षे मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या या संस्थेचा १११वा वर्धापनदिन २६ आणि २७ मे रोजी साजरा होणार आहे. २६ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ग्रंथ आणि
‘मसाप’चा रेखा ढोले पुरस्कार जाहीर पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) पुणे आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राजहंस’च्या एक अभिन्न सदस्य आणि राजहंस प्रकाशनाच्या पुस्तक निर्मितीच्या कार्याचा अविभाज्य घटक असलेल्या श्रीमती रेखा ढोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मसाप’तर्फे साहित्यक्षेत्रासाठी पुरस्कार दिले जातात. या वर्षी मराठी
डॉ. गाडगीळ सात ऑगस्टला ‘मसाप गप्पा’मध्ये पुणे : आपल्या सोप्या आणि सहजसुंदर शैलीतून विज्ञानविषयक लेखन करणारे प्रसिद्ध लेखक आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सात ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे
समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले पुणे : ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेची (मसाप) पंढरपूर शाखा आणि पंढरपूरचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक डिसेंबर २०१८ रोजी एक दिवसीय समीक्षा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड करण्यात आली असून, संमेलनाचे उद्घाटन प्रा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language